मी पुणे महानगरपालिकेच्या 'चंदूमामा सोनावणे हॉस्पिटल' मध्ये मानद बालरोगतज्ज्ञ म्हणूनही काम करते. आज बाह्यरुग्ण विभागात रूग्ण तपासत असताना, स्वतःबरोबर तीन-चार पोरे घेऊन आलेल्या एका बाईसोबत घडलेला माझा संवाद...
"किसको दिखाना है?"
तिने बकोटीला धरलेल्या एका पोराला पुढे केले.
"क्या तकलीफ है?"
"थोडी सर्दी है। नाकमेंसे पानी आ रहा है."
"बुखार या खाँसी है?"
"नहीं। बुखार खाँसी कुछ नहीं है"
"आपके घरमें, पिछले हफ्ते दो हफ्ते में बाहरसे कोई आया हैं क्या?"
"बाहरसे मतलब?"
"बाहर देशसे? दुबई, सौदी?"
"आप ऐसे क्यू पूछते है? हमारे घरमें कौन आयेगा?"
"अभी नयी बीमारी फैली है ना। इसीलिये हमें हर मरीजको पूछना पडता है।"
"हाँ, वो तो आपकी बात सही है। लेकिन हम बहुत गरीब लोग है। हम को खुद उमराह के लिये सौदी जाना है। हम सरकारी कोटे के वास्ते अपना नाम डालना चाहते है। लेकिन हमारा नाम आयेगा तो भी हम पैसे नहीं भर सकेंगे। इसीलिये हमने नामच नहीं डाला है।"
तिच्या बाळाला तपासून, त्याला फारसे काही झाले नसल्याचे मी तिला सांगते.
"और किसको दिखाना है? "
" खाली इसकोच दिखाना था। बाकी बच्चे तो ठीक है।"
"फिर सब बच्चों को इधर ला के भीड क्यों करते हो? ऐसे भीड लगाने से ही ये नयी बीमारी ज्यादा फैलनेवाली है। सरकार बार बार बता रही है ना, कि बिनावजह घर से बाहर मत निकलो? जो बच्चा बीमार है उसके इलावा बाकी बच्चोंको घरमें रख के आना था।"
"घरमें कैसे रखे? अब स्कूलको छुट्टी दी है ना। ये बच्चे शैतान है। बहुत सताते है। मेरी सास मेरे बच्चोंको संभालनेके लिये तैयार नहीं है। इनको बाहर खेलने के लिये भीं नहीं भेज सकते। बच्चे घरमें बोअर हो जाते है।इसलिये साथमें लेके आयी। इनको छोडे तो कहाँ छोडे?"
तिच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नसते. त्यामुळे मुकाट्याने मी तिला औषध लिहून देते.
प्रत्येकी दोन-तीन पोरे घेऊन आलेल्या, सर्व जाती-धर्मांच्या अनेक बायका आणि त्यांची पोरं बाहेर गोंगाट करत असतात. बऱ्याच जणी रांगेत न थांबता, मोठा घोळका करून गप्पा मारत असतात. नाकावरचा मास्क खाली ओढून पोरं इकडे-तिकडे उड्या मारत सगळीकडे हात लावत असतात.
ओपीडीमध्ये एका वेळी आम्ही तीन ते चार डॉक्टर्स प्रत्येकी एकेक मूल तपासत असतो. प्रत्येक मुलाबरोबर, दोन मोठी माणसे आत येतात, किंवा एखादी आई एकदम आपल्या तीन-चार पोरांना घेऊन आत घुसते. कितीही हुसकले तरीही आमच्या आसपास हे सगळे लोक गर्दी करतातच. आत आलेली चार-पाच वर्षांची पोरं आम्हाला खेटून उभी राहतात. काही पोरं, तोंडावर रुमाल न धरता, आमच्या अगदी जवळ उभी राहून खोकतात. केवळ पोरांना सुट्टी आहे म्हणून अनेक बारीक-सारीक तक्रारींसाठी लोक मुलांना घेऊन येत असतात.
सोशल डिस्टंसिंगचे महत्त्व आम्हाला माहीत असले तरीदेखील, समोरच्यांनाही ते माहिती असणे आवश्यक असते. तेही आम्ही समजावून सांगतच असतो. पण कोणी काही करो अथवा ना करो, आमच्या कर्तव्याची जाण ठेवून, सोशीकपणे, आम्ही रुग्णसेवा देण्याचे आमचे काम करतच राहतो.
Really thought provoking
उत्तर द्याहटवाइतका सोशिकपणा ठेवावा लागतो! म्हणूनही Drना परमेश्र्वर
उत्तर द्याहटवाम्हणणे योग्य होईल.कारण परमेश्र्वर असंच आपल्याला सहन करत
खरोखरीच चित्र विदारक आहे.
उत्तर द्याहटवादुबई हून येतानाच सर्दी होती म्हणून,
घरातच १४ दिवस अलगीकरण हवंय असं सागितल्यावर एक (सोलापूरचा) महाभाग गोव्याला गेला.
तिथं ४ दिवसात किती जणांना प्रसाद दिलाय कुणास ठाउक.
अशी का वागतात ही लोकं?
विनाकारण इतरांची हानी करणाऱ्या अशा लोकांना काय म्हणावं असा प्रश्न पडलेल्या एका सुभाषितकारानं चार ओळी लिहिल्या आहेत. त्यानं त्यात माणसांच्या स्वभावाचं वर्णन केलंय.
तो म्हणतो:
हे तो उत्तम जो निजर्थ त्यजूनी अन्यत्रही साधती..
हे तो मध्यम करिता अन्यत्र ही साधतील..
हे तो राक्षस जो निजर्थ करिता अन्यत्र विध्वंसती..
जे का व्यर्थ परार्थ हानी करिती ते कोण की दुर्मती....???
महानगर पालिकेच्या दवाखान्यात डाॕक्टर म्हणून काम करणे हे सोप्पे काम नाही ...सोशल डिस्टंसिंग याचा अर्थ किंवा जरूरी समजण्यासाठी लागणारी प्रगल्भता आपल्याकडे नाही ...बेफिकीरी , आज्ञान , सर्वभार दुसऱ्यावर टाकायची वृत्ती ,स्वच्छते बद्दलची अनास्था या सवयी समाजाला बदलाव्या लागतील .....रोगप्रतिकारक शक्ती आणि असंख्य चांगल्या माणसांचे मनोबल तुमच्या सारख्या डाॕक्टरांच्या मागे आहे आणि कायम राहील .....विनायक जोशी
उत्तर द्याहटवाखरय. काहीजणांच्या काहीसमस्या या कल्पनातीत असतात . याच अनुभावाचे अनुषंगाने लिहायचे झाले तर डाँक्टर्स ची समस्या व संबधित रूग्णांच्या नातेवाइकांच्या समस्या दोन्हीही ख-या आहेत.,
हटवाया निमित्ताने विचार प्रवर्तक मुद्दा छान प्रकारे मांडला आहे. धन्यवाद .